- फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
- आईच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात फिनिक्स भरारी -जालिंदर बोरुडे
अहमदनगर(प्रतिनिधी)- जागतिक मातृ सुरक्षा दिवस निमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे ज्येष्ठ
महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. फिजीकल डिस्टन्स व इतर नियमांची अंमलबजावणी करुन घेण्यात आलेल्या या शिबीरास महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. महिलांच्या आरोग्यासह डोळ्यांची देखील तपासणी करण्यात आली. 23 महिलांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, आईच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात फिनिक्स भरारी घेतली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात इतर आरोग्याचे प्रश्न देखील भेडसावत आहे. लॉकडाऊनकाळात नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न बिकट बनला असताना मोफत आरोग्य शिबीर मोठे आधार ठरणार आहे. या भावनेने फिनिक्स फाऊंडेशन आरोग्य क्षेत्रात आनखी भरीव योगदान देणार असल्याचे सांगितले.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात डॉ.संजय शिंदे, डॉ. मेहेर, माया आल्हाट यांनी रुग्णांची तपासणी केली. गरजू रुग्णांना मोफत औषधे व नंबरचे चष्मे देण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सौरभ बोरुडे, बाबासाहेब धीवर, अक्षय धाडगे, विशाल गायके, गौरव बोरुडे, मोहनीराज कुरे आदींसह फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.








