राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी अभिमन पगार यांची निवड

नाशिक (प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी उत्राणे ता. सटाणा जि. नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकरी अभिमन सुरेश पगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी ही नियुक्ती केली असून आक्रमक आणि अभ्यासू कांदा उत्पादक अभिमन पगार यांच्याकडे नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली असून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील वरिल जिल्ह्यांतील कांदा उत्पादकांचे संघटन करणे या जिल्ह्यांतील कांदा उत्पादकांच्या कांदा बियाणे पासून कांदा लागवडीपासून ते कांदा विक्री ,व साठवणूकी संदर्भात येणाऱ्या सर्वच छोट्या मोठ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अभिमन पगार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून अभिमन पगार हे संघटनेच्या नाशिक जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत होते.त्यांनी नामपुर बाजार समितीच्या कारभारात सुधारणा व्हाव्यात म्हणून वेळोवेळी केले ले लक्षवेधी आंदोलन कांदा उत्पादकांच्या दृष्टीने दखल पात्र ठरली आहेत.

अभिमन पगार यांच्या निवडीचे संघटनेचे राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील, संपर्क प्रमुख कुबेर जाधव नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय भदाणे, सोशल मीडिया प्रमुख केदा हरी पगार यांच्यासह कसमादे पट्ट्यातील कांदा उत्पादकांनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here