- रिक्षाचालक पत्नीकडून दोन प्रियकरांच्या साथीने पतीची हत्या
ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – 7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाच्या हत्येचं गूढ उकलण्यात कल्याण पोलिसांना यश आलं आहे. रिक्षा चालक पत्नीने दोघा प्रियकरांच्या साथीने पतीच्या हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. कल्याण क्राईम ब्रांचने आरोपी महिलेसह तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.
प्रवीण पाटील या तरुणाच्या हत्या प्रकरणात कल्याण क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली. 17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रवीणच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं. रिक्षा चालक पत्नीने दोघा प्रियकरांच्या साथीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी पत्नीसह तिघे दोन प्रियकर कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहेत.







