विजय मल्ल्याकडून ६२०० कोटी कर्जवसूलीसाठी एस.बी.आय.चा मोठा निर्णय

vijay-mallya

नवी दिल्ली – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्त्वात असलेल्या बँकांचा एक गट किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या ६२०० कोटी रुपयांच्या कर्जाची वसूली व्यापारी विजय मल्ल्याच्या तीन कंपन्यांमधील भागधारकांची विक्री करुन करणार आहे. मल्ल्याचे युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅक्डोव्हल होल्डिंग्स लिमिटेडमधील शेअर्स २३ जून रोजी बल्क डीलद्वारे विकले जातील.

किंगफिशर एअरलाइन्स ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे. कर्ज फेडण्यासाठी आणि बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी जानेवारी २०१९ मध्ये मल्ल्याला देशातून फरारी आर्थिक अपराधी घोषित करण्यात आले होते. तो ब्रिटनच्या न्यायालयात प्रत्यार्पणाच्या विरोधात खटला लढवत आहे, जर मल्ल्याचे शेअर्स विकले गेले तर किंगफिशर विजय मल्ल्या प्रकरणातील बँकांची ही पहिली मोठी वसुली असेल. किंगफिशरला दिलेले कर्ज २०१२ च्या उत्तरार्धात एनपीए झाले होते. मार्च २०१६ मध्ये मल्ल्या देश सोडून गेला. त्याच्यावर १७ बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मनीकंट्रोलला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, शेअर्सची विक्री बेंगळुरूच्या डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनलच्या देखरेखीखाली होईल. ज्याने ६२०३ कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी समभागांची विक्री करण्याचे वसुली अधिकार अधिकाऱ्यास दिले आहे. जर ब्लॉक डील अंतर्गत शेअर्स विकले गेले नाहीत, तर बँका समभाग ब्लॉक किंवा रिटेलच्या माध्यमातून विकू शकतात. एसबीआयशिवाय किंगफिशरला कर्ज देणार्‍या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, अलाहाबाद बँक, फेडरल बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here