नवी दिल्ली – अलिकडच्या काही वर्षांमध्ये विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक वेगवेगळ्या गोष्टींवर सतत प्रयोग करुन नवनवीन शोध लावत असतात. सध्या असाच काहीसा अजब शोध चीनमधील वैज्ञानिकांनी लावला आहे. एका रिसर्चनंतर चीनच्या वैज्ञानिकांनी पुरुष देखील प्रेग्नेंट होऊ शकतात, असा दावा केला आहे.
चीनच्या काही वैज्ञानिकांनी नर उंदरामध्ये गर्भधारणेची पिशवी बसवून काही पिलांना जन्म दिला आहे. नर प्राण्याला प्रेग्नेंट करण्याचा अजब गजब प्रयोग जगभरात प्रथमच झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चीन मधील शास्त्रज्ञ यावर रिसर्च करत असल्याचं चीनमधील वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
हा प्रयोग चीन मधील शांघायच्या नेवल मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये करण्यात आला आहे. वैज्ञानिकांनी प्रथम मादी उंदराच्या बॉडीमधून गर्भधारणेची पिशवी काढली. यानंतर ती पिशवी नर उंदरामध्ये बसवण्यात आली. पुढे प्रेग्नेंट नराचं सिजेरियन करून त्याच्या पिलांना जन्माला घालण्यात आलं. हा प्रयोग चार टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.
वैज्ञानिकांच्या मते ज्या तृतीयपंथींन्ना मुलांना जन्माला घालायचं आहे, त्यांना याची मदत होणार आहे. सध्या याचा सक्सेस रेट 3.68 टक्के आहे. आता पुढील टप्प्यात चीनचे वैज्ञानिक या रॅट मॉडेलचा वापर मानवांवर करण्याचा विचार करत आहेत. यापूर्वी NYU स्कूल ऑफ मेडिसीनने असाच एक प्रयोग केला होता. मात्र, तो अयशस्वी ठरला होता.






