शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – क्वालिटी आणि विनम्र सेवेची ५६ वर्षांपासूनची ओळख असलेले नवजीवन प्लस सुपरशॉपने खान्देशात प्रथमच ग्राहकांना खरेदीचे स्वातंत्र्य दिले. सुपरशॉप ही संकल्पना रुजवत असतांना सचोटी आणि प्रामाणिकतेने ग्राहकात मानाचे स्थान पटकावले आहे. आज (दि.१९) नवजीवन प्लस सुपरशॉपने शहादा शहरात सुपरशॉप उघडून नव्या जमान्यातील नवीन ट्रेंड असलेला मॉडर्न ट्रेड पोहचवला आहे.
ग्राहकाभिमुख सेवेचे ब्रीद घेऊन केवळ दोन शाखांमध्ये सुरु झालेली नवजीवनची घौडदौड आज आठ शाखांएवढी विस्तारीत झाली असून, जळगाव जिल्ह्यातून आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे क्षीतिज नवजीवनला खुणावत आहे. आज (दि.१९) पासून सुरु झालेल्या नवजीवन प्लस शहादा येथील शाखेचा शुभारंभ अगदी साध्या पध्दतीने करण्यात आला. शुभारंभानिमित्ताने रु.९९९ च्या खरेदीवर रु.१००ची सूट सर्व ग्राहकांना देण्यात येणार असून, कोरोना प्रतिबंध लक्षात घेऊन जास्तीत जास्त ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता यावा म्हणून शुभारंभ योजना दि. १९ जून ते २९ जून अशी ठेवण्यात आली आहे.
जैन टेन्ट हाऊस शहादा यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या या शाखेला ग्राहकांनी भेट देवून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन, जैन व कांकरिया परिवाराने केले आहे.






