नवी दिल्ली – तब्बल सात वर्षांनंतर टेस्ट क्रिकेट खेळत असलेल्या भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धची त्यांची एकमेव टेस्ट ड्रॉ केली. टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडच्या महिला संघाने ९ बाद ३९६ वर डाव सोडला. दीर्घ काळानंतर टेस्ट खेळत असलेल्या भारतीय महिला संघाचे खेळाडू चाचपडत होते. टीममधील पाच खेळाडूंनी तर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नवख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या या टीमने पहिल्या डावात सर्वबाद २३१ धावा केल्या. इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय महिला संघाने आठ बाद ३४४ धावा करुन टेस्ट मॅच ड्रॉ केली.
इंग्लंडकडून पहिल्या डावात कर्णधार नाइटने सर्वाधिक ९५ धावा केल्या. सोफिया डंकले (नाबाद ७४ धावा), ब्यूमाँट (६६ धावा), श्रृबसोल (४७ धावा), सायवर (४२ धावा) आणि विनफिल्ड हिल (३५ धावा) यांनी छान कामगिरी केली. भारताच्या स्नेह राणाने चार, दीप्ती शर्माने तीन, झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्रकारने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताने पहिल्या डावात सर्वबाद २३१ धावा केल्या. १७ वर्षांच्या शेफाली वर्माने पदार्पणातच ९६ धावा केल्या. तिची टेस्ट सेंच्युरी चार धावांनी हुकली. स्मृती मंधानाने ७८ धावा केल्या. यानंतर दीप्ती शर्माच्या नाबाद २९ धावा वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडच्या अॅक्लेस्टोनने चार, कर्णधार नाइटने दोन विकेट घेतल्या. ब्रंट, श्रृबसोल, सायवर आणि क्रॉस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
That was some batting from Sneh Rana & Taniya Bhatia who showed resilience to help #TeamIndia secure a draw🔝
Top-notch effort from 🇮🇳.👏🏻 #ENGvIND
Sneh Rana – 8️⃣0️⃣*
Taniya Bhatia – 4️⃣4️⃣*
Their partnership 🤝🏻 – 1️⃣0️⃣4️⃣*OUTSTANDING 👌🏻💪🏻
Scorecard 👉 https://t.co/Em31vo4nWB pic.twitter.com/oHYcqciFAM
— BCCI Women (@BCCIWomen) June 19, 2021
इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय महिला संघाने आठ बाद ३४४ धावा करुन टेस्ट मॅच ड्रॉ केली. दुसऱ्या डावात शेफाली वर्माने पुन्हा अर्धशतक केले. यावेळी तिने ६३ धावा केल्या. पहिल्या डावातील कामगिरीमुळे तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या दीप्ती शर्माने ५४ धावांचे योगदान दिले. नवव्या विकेटसाठी स्नेह राणा (नाबाद ८० धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटिया (नाबाद ४४ धावा) यांनी मोठे योगदान दिले. यामुळेच भारताने मॅच ड्रॉ केली.
इंग्लंडकडून अॅक्लेस्टोनने सलग दुसऱ्या डावातही चार विकेट घेतल्या. सायवरने दोघींना बाद केले. कर्णधार नाइट आणि ब्रंट या दोघींनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच दोन्ही डावात अर्धशतक करणाऱ्या शेफाली वर्माचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.






