मुंबईतून अवैध शस्त्रसाठा जप्त

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – मध्य प्रदेशातून मुंबईत विक्रीसाठी घेऊन आलेल्या शस्त्रसाठ्यासह तरुणास गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई मुलुंड येथे पूर्वद्रुतगती मार्गावर करण्यात आली. या कारवाईत १० देशी पिस्तूल, दोन मॅगझीन आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

लाखन चौहान (21) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात गुन्हे शाखेच्या घाटकोपर कक्षाने दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक केली होती. तिघांच्या चौकशीतून लाखन याचे नाव पुढे आले.

मध्य प्रदेशच्या बिरवाणी जिल्ह्यात राहाणारा लाखन आणि त्याच्या गावातील बरेच जण घरी शस्त्र तयार करतात आणि महानगरांमध्ये अवैधरीत्या तस्करी, विक्री करतात. त्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली शस्त्रे लाखन यानेच तयार केली होती, अशीही माहिती समोर आली.

तेव्हापासून घाटकोपर कक्षातील अधिकारी लाखनच्या मागावर होते. घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना लाखन आणि त्याचे साथीदार मोठा शस्त्रसाठा घेऊन मुलुंड येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here