मागील भांडणाची कुरापत काढून मद्यपीकडून एकास मारहाण

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – मागील भांडणाची कुरापत काढून मद्यापीने एकास बेदम मारहाण केल्याची घटना भद्रकालीतील घासबाजार येथे घडली.

रोहित ज्ञानेश्‍वर सोळसे (रा. भिमवाडी, भद्रकाली) असे मारहाण करणार्‍या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी इक्रमा इलाही कुरेशी (५१, रा. फुले मार्केट, भद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित सोळसे याने मागील भांडणाची कुरापत काढून कुरेशी यांना मारहाण केली. तसेच फरशीचा तुकडा डोक्यात घालुन गंभीर जखमी केले.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक माळी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here