शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज शिर्डी येथे साईबाबा द्वारकामाई मंदिरासमोर शिंदे वाडा या साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे पा. यांच्या मुळ वाड्यात लक्ष्मीबाईंचे खरे वारसदार शिंदे पाटील परिवाराने साईबाबांनी अखेरच्या क्षणी दिलेली चांदीची 9 नाण्यांची विधीवत पुजा करुन हार – फुले व नैवेद्य प्रसाद अर्पन करुन शिर्डी साईभक्त ग्रामस्थांसह सर्वांना एकादशी निमित्ताने 500 भक्तांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले..कोरोणाचे सावट असल्याने मिरवणूक न काढता तसेच मोठा कार्यक्रम करता आला नाही.
याप्रसंगी शिर्डीतील प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते पा.,नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर पा., दिलीपशेठ संकलेचा, कमलाकर कोते, सुजित गोंदकर, ताराचंद कोते, प्रमोद गोंदकर, सर्जेराव कोते, नितीन कोते, रविंद्र कोते, बाळासाहेब गोंदकर , अशोकराव कोते, विनोद गंगवाल, अशोक उर्फ पप्पु गायके, ॲड आसनेसो, संदीप पारख, बाळासाहेब लुटे, सचिन लुटे, मिलिंद कोते, राहुल गोंदकर, चंद्रकांत गायकवाड, विलास कोते, राजेंद्र कोते, वैभव कोते, यांचेसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


मान्यवरांसह शिंदे पाटील कुटूंबातील जेष्ठ सदस्य आण्णासाहेब शिंदे पा.व सुधाकरआप्पा शिंदे, भाऊसाहेब शिंदे, बापुसाहेब शिंदे, सचिन शिंदे, संजुअप्पा शिंदे, जितेंद्र शिंदे , रविंद्र शिंदे, शैलेश शिंदे, निलेश शिंदे , दत्तात्रय शिंदे , दिपक शिंदे , निलेश शिंदे , गणेश शिंदे ,चंद्रकांत शिंदे ,बाबासाहेब शिंदे ,नानासाहेब शिंदे , मच्छिंद्र शिंदे , आदी शिंदे पाटील परिवार सर्व महीलांसह उपस्थित होते, असे रविंद्र शिंदे व संजय अप्पा शिंदे यांनी सांगितले.






