पोस्कॉ महाराष्ट्र स्टिलद्वारे रायगड पोलिसांना साहित्य वाटप

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – कोव्हिड महामारीत रायगड पोलीस नागरिकांना सामाजिक अंतर पाळावयास लावणे तसेच घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करणे, मात्र दिवस-रात्र पावसात रायगड पोलीस आपली सेवा बजावत असल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून पोस्कॉ कंपनीने रायगड पोलिसांना पावसाळी उपयोगी साहित्य वाटप केले.

पोस्कॉ महाराष्ट्र स्टिल यांना रायगड पोलिसांच्या कामाचा आदर असून त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून पोलीस निरीक्षक माणगाव, रोहा, कोलाड यांच्याकडे बॅरिकेट स्टडी फलक, वाहतुक नियंत्रक सुरक्षा दंड, फोल्डेबल खुर्चा, टॉर्च, रेनकोट, फोल्डेबल छत्री, पाण्याच्या बाटल्या, छ-95 मास्क व सॅनिटायझर इत्यादी वस्तू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट दिल्या.

raigad-police

रायगड जिल्ह्यातील विळे भागात एमआयडीसी परिसरात असलेल्या पोस्कॉ महाराष्ट्र स्टिलद्वारे उच्च प्रतिच्या गॅल्वनाईज व गॅल्वाअनिल्डची निमित्ती केली जाते. ज्याचा वापर सर्व प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात, बांधकाम क्षेत्रात, घरगुती उपकरणे व वाहन उद्योग इत्यादीसाठी केला जातो. रायगड पोलीस कोव्हीड -19 विरुद्ध देत असलेल्या योगदानाचा पोस्कॉ महाराष्ट्र स्टिल आदर करते व रायगडच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करते. त्यांच्याकडे असलेले त्यांचे रेनकोट अतिशय वार्‍यामुळे फाटून गेले होते. कंपनीने दिलेल्या या मौल्यवान भेटीबद्दल कंपनीस पोलीस धन्यवाद देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here