सोलापूरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; पोलिस स्टेशनला तक्रारी दाखल

thief

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आला होता. आता रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता शहरात चोऱ्य़ांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घरफोडी, चोऱ्य़ा, जनावारांच्या चोऱ्य़ा आणि सोनसाखळी हिसकावण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी तीन घटनांमध्ये तब्बल दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळय़ा चोरीच्या घटना वाढत होत्या. संशयित चोरटे दुचाकीकरून येऊन शेळ्या लंपास करत असल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. डीबी पथकाने तपासाची चक्रे फिरवित दोघांना अटक करून 1 बोकड आणि 2 शेळ्या जप्त केल्या. तसेच इतर गुन्हे उघडकीस आणून, 1 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेत अब्बास नजीर शेख (वय 35 वर्ष, रा. नई जिंदगी, सोलापूर) आणि त्याच्या बहिणीचा पती असिफ अखलाख शेख) यांना पोलिसांना अटक केली. हे दोघे मिळून शेळय़ा चोरत होते. चोरीच्या अन्य एका प्रकरणात विकास भिका पवार (वय २१, रा. धोत्रेकर वस्ती, सोलापूर) यास घरफोडीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

पब्जी खेळण्यासाठी मुलाने मोबाईल चोरला
दुसऱ्य़ा घटनेत अल्पवयीन मुलाने ‘पब्जी’ खेळण्यासाठी मोबाईल चोरल्याची घटना उघडकीस आली. १३ जून रोजी कुंभार केस येथील एका व्यापाऱ्य़ाने स्मार्ट फोन चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीमध्ये मुलाने पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल चोरल्याचे कबूल केले.

महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावणारा २४ तासांत ताब्यात
रस्त्यावरून फिरणाऱ्य़ा महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळणाऱ्य़ा आरोपीस सदर बाजार पोलिसांनी २४ तासांत अटक केले. मंजुनाथ दीपक जाधक असे आरोपीचे नाव आहे. जाधव याच्यावर यापूर्वी धावत्या रेल्वेमध्ये दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल झाला, तसेच त्याने शहरातील ज्या महिलेला चोरलेले सोन्याचे ऐवज विकले होते, तिलाही पोलिसांनी सहआरोपी म्हणून अटक केली आहे. सात रस्ता येथून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्य़ा मुख्य मार्गावर गंगाबाई चाबुकस्वार (वय ५७, रा. वीरप्पानगर, ता. इंडी, जि. विजापूर) या चारचाकी वाहनात बसत होत्या. यावेळी मंजुनाथ जाधव याने त्यांच्या गळय़ातील सोन्याची चेन हिसकावली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here