महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्रालया अंतर्गत महाजनको विभागात ८०० कोटीचा घोटाळा?

महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयामध्ये अजब कारभार

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – ऊर्जा खाते अंतर्गत येणाऱ्या महाजेनको महामंडळ मध्ये होतोय भ्रष्टाचार एकीकडे महाविकास आघाडीचे सरकार मध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे.त्यातच आता ऊर्जा खात्याच्या महाजेनको विभागात पुन्हा ८०० कोटीचा घोटाळा (?) ऊर्जा मंत्रालय – महाजेनको कडून होत आहे. रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महाजेनको यांनी नागपूर येथील कोळसा वॉशिंग करण्याचे दिलेले टेंडर बोगस पद्धतीने डमी कागदपत्र तयार करून दिलेले आहे. ते टेंडर तात्काळ रद्द करावे .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे वेब मीडिया असोशिएशनने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जवळच्या व्यक्ती संजय हरदवाणी यांच्या रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीला कोळसा वॉशिंग करण्याचे दिले टेंडर. LOA जारी केला असून, ऊर्जा मंत्री,महाराष्ट्र राज्य यांचा कलेक्शन माफिया -संजय हरदवाणी यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यवाही करतील का ? ऊर्जा मंत्रालय अंतर्गत येणारे महाजेनको यांच्या तर्फे राज्यात सुरू असलेले सर्व कामाच्या टेंडरची टक्केवारी संजय हरदवानी हे क्लेक्शन करून ऊर्जा मंत्री यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करतात ? असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

कोळसा वॉशिंग करण्याचे २० % टेंडर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला संजय हरदवाणी यांच्या रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या पात्र नसलेल्या कंपनीला टेंडर देण्यात आले. त्याचा प्रथम टप्पा LOA जारी केला आहे. रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कोळसा वॉशिंग करण्याचा कोणताही अनुभव नाही. कधीही यांनी कोळसा वॉशही केलेला नाही.टेंडरच्या नियम व अटीशर्ती मध्ये ही कंपनी कुठेही बसत नाही उदाहरणार्थ रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा टर्न ओव्हर नाही नेटवर्क नाही सेक्युरिटी क्लिअरन्स नाही कोळसा वॉशिंग करण्याचा कुठलाही अनुभव नाही आणि अशा व्यक्तीला ऊर्जा मंत्रालयाने LOA जारी केला आहे. असा भोंगळ कारभार ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू आहे.

रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एक अशा कंपनीची वॉशरी भाडेतत्त्वावर घेतली आहे. ती कंपनी ब्लॅक लिस्टडेट आहे फ्रॉड आहे. कोळसा अफरातफरीच्या अनेक केसेस या इंडो युनिक फ्लेम लिमिटेड नावाच्या कंपनीवर सुरू आहेत तसेच इंडो युनिक फ्लेम लिमिटेड ही कंपनी बँकेत NPA आहे. NCLT मध्ये या कंपनीविरुद्ध खटला सुरू आहे अशा फ्रॉड कंपनीच्या वाशरी मध्ये ही रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोळसा वॉशिंग करणार आहे. त्यात काय पारदर्शकता राहील.

web media nivedan

टेंडरचे सर्व नियम डावलून टेंडरच्या नियम अटी शर्ती मध्ये फेरफार करून सर्व अटी शर्तींचा भंग करून रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला टेंडर दिले आहे. या विरुद्ध वेब मीडिया असोसिएशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यालयात व प्रधान सचिव विकास खारगे यांना सदर टेंडर रद्द करण्या संदर्भात सविस्तर विश्लेषण व पुरावे देण्यात आले आहे.तसेच त्याची कॉपी ऊर्जा मंत्रालयात ही पाठवण्यात आली आहे. तरी राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे. व सदर रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेले टेंडर तात्काळ रद्द करावे अशी वेब मीडिया असोशिएशनची मागणी केली आहे. अन्यथा अनेक सामाजिक संघटनांनी मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

हा संजय हरदवाणी कोण?
संजय हरदवानी नावाचा माणूस हा नागपूर येथील रहिवाशी आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा जवळचा मित्र आहे. गेल्या २० वर्षांपासून हा नितीन राऊत यांचा मित्र आहे. महाजेनको मध्ये कोळसा संबंधित जेवढे हि काम होत आहे. त्या सर्वां कामांमध्ये याचा सहभाग आहे. छत्तीसगड येथून गेल्या ०२ वर्षांपासून येणारा कोळसा यात ही या संजय हरदवाणी याचा सहभाग आहे. अधिकाऱ्यांना व ऊर्जा मंत्री यांना कलेक्शन करून देणे ? टेंडर मधून टक्केवारी काढून पैसे पोहचवणे? हे यांचे काम आहे. यांची चौकशी होऊन कार्यवाही कधी होते यावर आता सर्वांचे लक्ष आहे. ऊर्जा मंत्रालयाशी व महाजेनको अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here