शालांत परिक्षेत पी.आर.हायस्कूलची यशाची परंपरा कायम

धरणगाव (योगेश पी पाटील) – यशाची आणि गुणवत्तेची परंपरा असणार्‍या शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूलची गुणवंत विद्यार्थिनी विशाखा विजय माळी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
पी. आर. हायस्कूलच्यावतीने विशाखाच्या घरी जाऊन तिचा सत्कार करताना उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, सोबत मुख्याध्यापक एस. एम. अमृतकर, ज्येष्ठ शिक्षक यू. एस. बोरसे, शरदकुमार बन्सी, मेजर डी. एस. पाटील,डी.एच.कोळी आणि विशाखाचे आई वडील, आजी आजोबा आणि परिवार.
एका भाजीपाला विकणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन करून केवळ माळी वाड्यातीलच नव्हे तर धरणगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शाळेत पायी जाणार्‍या विशाखाला आता माननीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या वतीने तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पहिली स्कुटी मिळण्याचा सन्मानही मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here