नवी दिल्ली- राफेल विमानांची पहिली तुकडी आज भारतात दाखल झाली. फ्रान्समधून 7 हजार किलोमीटरचं अंतर कापत 5 राफेल लढाऊ विमाने भारताच्या अंबाला हवाई तळावर पोहोचली. यावेळी खास पद्धतीने राफेलचे स्वागत करण्यात आले आहे. राफेल विमानाने अंबाला हवाईतळावर उतरताच त्यांना वॉटर सल्यूट देण्यात आला. राफेल विमानांच्या दोन्ही बाजूंनी पाण्याची फवारणी करण्यात आली होती. याचा व्हिडिओ भारतीय हवाई दलाने पोस्ट केला आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया विमानांच्या आगमनावेळी अंबाला हवाई तळावर उपस्थित होते.
शत्रूच्या काळजात धडकी भरवणाऱ्या ३६ पैकी ५ राफेल rafale India फायटर हरयाणातील अंबाला हवाईतळावर आगमन झाले आहे. दुपारी ३.१३ मिनिटांनी राफेल मेघगर्जना करत अंबाला हवाईदलाच्या तळावर दाखल झाले. तब्बल २२ वर्षांनंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात नवीन विमाने दाखल झाली. यापूर्वी १९९७ मध्ये भारताला रशियाकडून सुखाई विमान मिळाले होते.
राफेल दाखल होताच राजनाथसिंह यांनी सांगितले की, राफेल मुळे भारतीय संरक्षण क्षेत्राच्या इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारतीय हवाईदलाची शक्ती वाढवणाऱ्या या विमानाचा नेत्रदीपक व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. राफेलचे स्वागत एयरचीफ मार्शल आरकेएस भदौरिया व त्यांच्या टिमने केले.
विमानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अंबाला येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हवाईतळाच्या आजपासच्या चार गावात कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकांना घराच्या गच्चीवर जमा होणे, फोटो काढणे किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हलाई तळाच्या 3 किलोमीटरच्या परिसरात ड्रोन दिसल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. संध्याकाळी जळत्या मेणबत्या हातात घेऊन राफेलचे स्वागत करण्याचे आवाहन स्थानिक आमदाराने केले आहे.
From speed to weapon capabilities, Rafale is way ahead!
I am sure these world class fighter jets will prove to be a game changer. Congratulations to PM @narendramodi ji, DM @rajnathsingh ji, Indian Air Force and the entire country on this momentous day. #RafaleInIndia pic.twitter.com/1PuSgVtlZm
— Amit Shah (@AmitShah) July 29, 2020







