चिंताजनक : महाबळेश्वरमधील दोन प्रजातींच्या वटवाघळांत आढळला निपाहचा विषाणू

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. अशावेळी आता राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. याबाबतचे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे.

निपाह विषाणू सातारा जिल्ह्यातील मिनीकाश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आला आहे. याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली.

मार्च २०२०मध्ये सातऱ्यातील महाबळेश्वरमधील गुहेत हे वटवाघूळ सापडले आहेत. देशात याआधी काही राज्यात निपाह विषाणू आढळला होता पण राज्यात याआधी वटवाघळांमध्ये निपाह विषणू कधीही आढळला नव्हता. हा विषाणू वटवाघूळांमधून मानवाच्या शरिरात संक्रमित होतो.

निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही लस किंवा औषध उपलब्ध झालं नाहीये. त्यामुळं हा विषाणू धोकादायक मानला जातो. हा विषाणूचा मृत्यूदरही अधिक आहे. औषध उपलब्ध नसल्यानं मृत्यूदर तब्बल ६५ टक्क्यांच्या पुढे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते. करोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा करण्यात येत आहे.

भारतात यापूर्वी २००१मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात सिलिगुडी (पश्मिम बंगाल) येथे निपाहचे ६६ रूग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रूग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. तर, २००७मध्ये एप्रिल महिन्यात पश्निम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here