नाशिक येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – दुचाकीवरून रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावर ट्रक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावर पंचवटी परिसरात घडली…

सुवर्णा अशोक गायकवाड (४८, रा. मेनरोड गल्ली, आडगाव) असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे पती अशोक विश्वास गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे.

गायकवाड दांम्पत्य दुचाकीवरून आडगाववरून पंचवटीकडे जात असताना सुवर्णा गायकवाड यांचा तोल जाऊन त्या दुचाकीवरून खाली पडल्या. दरम्यान पाठिमागुण वेगात येणार्‍या एमएच १५ जीव्ही ५५९२ या ट्रकचालकाला ट्रक नियंत्रित न झाल्याने गायकवाड या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरिक्षक कासर्ले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here