मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्यांना दंड करण्यात आला आहे. पाच हजार रुपये मुख्यमंत्री कोविड निधीत जमा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. याबाबत न्यायमूर्ती चांदीवाल यांनी स्वतः निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जबाब नोंदवला आहे.






