नगरसेवकांसह समाजसेवक, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहरातील प्रभाग क्र. 2 अर्थात शिवाजीनगर परिसरात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांच्या हस्ते आज मंगळवार, दि. २२ जूनला सकाळी काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे कुदळ मारून व श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.
प्रभागाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, नगरसेविका सौ.कांचन सोनवणे, सौ.गायत्री शिंदे यांच्यासह महापालिका अभियंता चंद्रकांत सोनगिरी, महापालिका कर्मचारी प्रकाश सोनवणे, शांताराम सोनवणे तसेच समाजसेविका सौ. ज्योत्स्ना दारकुंडे, समाजसेवक नीलेश तायडे, मनोज सोनवणे, भगवान सोनवणे, गोपी गोसावी, मनोज आटवाल, विजय राठोड, उत्तम शिंदे, रवी पाटील, कौशल भोसले व प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






