जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान; आज आढळले ३४२ कोरोनाबाधित रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 342 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 10 हजार 591 झाली आहे. सर्वाधिक 61 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 280 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात बुधवारी नव्याने ३४२ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 6१, जळगाव ग्रामीण १६, भुसावळ 20, अमळनेर २३, चोपडा २२, पाचोरा ४४, भडगाव ९, धरणगाव १६, यावल १६, एरंडोल २२, जामनेर १९, रावेर १०, पारोळा ३, चाळीसगाव २८, मुक्ताईनगर १५, बोदवड २ व इतर जिल्ह्यातील ३ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 1२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, जामनेर व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी २, अमळनेर तालुक्यातील ३, पाचोरा, चोपडा व रावेर या तालुक्यांमधील प्रत्येकी एक याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती शासकीय महाविद्यालय व तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here