पुणे – पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका शिपायाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ “सॉरी मॉम” असे लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक हा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. पण गेल्या काही वर्षांपासून तो पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त फोन करत होते.
मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी थेट तो राहत असलेले ठिकाण गाठले. पुण्यातील किकवी या गावी रज्जाक राहत होता. त्या ठिकाणी आल्यानंतर नातेवाईकांना रज्जाक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.







