पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोना काळात बंद करण्यात आलेली मुंबई व पुणेकरांची आवडती दख्खनची राणी शनिवारपासून पुन्हा धावणार आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रथमच या गाडीला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. यामुळे पुणे – मुंबई प्रवास आनंददायक होणार आहे.
दख्खनची राणी ही २५ जून रोजी मुंबई हुन दुपारी ५ वाजून १० मिनिटांनी निघेल. पुण्याला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पोहचेल. दख्खनची राणी मुंबई हुन सकाळी ७ वाजता निघेल. पुण्याला ११ वाजून ०५ मिनिटांनी पोहचेल. तर हीच गाडी पुण्यातून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी निघेल. मुंबईला संध्याकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी पोहचेल.
पुणे-मुंबई दरम्यान धावणारी एकमेव दख्खनची राणी मागच्या महिन्यात बंद झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. नोकरीनिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांना असुविधांचा सामना करावा लागत होता. गेल्या लॉकडाउनपासून प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू होते. मागील वर्षी रेल्वे सेवा बंद असल्याने कित्येक महिने प्रवाशांना खासगी वाहनाने, दुचाकीने जीव धोक्यात घालून प्रवास करुन आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. आता या निर्णयाने या सर्व प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.






