महात्मा फुले ब्रिगेडच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी उषाताई वाघ याची निवड

धरणगाव (योगेश पी.पाटील) – येथील माळी समाजाचे सामाजिक कार्यकर्त्या धरणगाव चे माजी नगराध्यक्ष उषाताई गुलाबराव वाघ यांची महात्मा फुले ब्रिगेडच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पाच वर्षे नगराध्यक्ष होते तेंव्हा केलेली विकासाची कामे, समाजाचा प्रत्येक कार्यक्रमधे सक्रिय सहभागी होवुन त्यांच्या स्वतःच्या मातोश्री बहुउद्देशीय संस्थे विवीध उपक्रम राबवणे , महिला अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणे हे सामाजिक काम पाहुन, त्यांची ही नियुक्ती नुकतेच महात्मा फुले ब्रिग्रेडचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांनी एका पत्रान्वये केली आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा ना गुलाबराव पाटील , महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी , शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन , नगरसेविका सुरेखा विजय महाजन,धरणगाव माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन,चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, महात्मा फुले बिग्रेड चे तालुका अध्यक्ष नरेंद्र महाजन ,व शिवसेना नगरसेविका कल्पना विलास महाजन,सुरेखा विजय महाजन, अंजलीताई विसावे, आराधना नंदलाल पाटील, मंदाताई जितेंद्र धनगर, किर्ती किरण मराठे, पार्वताबाई पाटील, महिला आघाडी शहर प्रमुख रत्नाताई धनगर यांनी सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देवुन अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here