आखाती देशांमधून वैद्यकीय साहित्य घेऊन भारतीय नौदलाचे शार्दुल जहाज मुंबईत दाखल

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – कुवेत आणि कतार या देशांतून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन भरलेले ७,६४० सिलेंडर्स, प्रत्येकी २० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन असलेले २ आयएसओ कंटेनर्स, आणि १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेऊन आलेले भारतीय नौदलाचे शार्दुल नामक जहाज आज २४ जून २०२१ रोजी मुंबई बंदरात दाखल झाले.

आखाती देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन देशात वाहून आणण्यासाठी या जहाजाची नेमणूक करण्यात आली होती. कोविड-१९ महामारीशी लढा देण्याच्या देशाच्या प्रयत्नांना पाठींबा देण्यासाठी भारतीय नौदलाने सुरु केलेल्या समुद्र सेतू २ मोहिमेचा भाग म्हणून ही नेमणूक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here