महात्मा फुले हायस्कूल एरंडोल चा 100% निकाल

जळगांव (निलेश पाटील) – काल (दि.२९) एस एस सी परीक्षेचा निकाल जाहिर झाला सदर परीक्षेत महात्मा फुले हायस्कूल ने घवघवीत यश प्राप्त केले या परीक्षेत प्रवीण सखाराम बारेला 86.40% प्रथम, राजेश मगन नाईक 84.00% द्वितीय, सागर सखाराम बारेला 81.80/ तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
परीक्षेस एकूण 38 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. 100%विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अतिशय विपरित परीस्थितीत या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून व स्वता बाहेर काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवीला व शिक्षकांनी सुध्दा त्यांना प्रोत्साहन दिले व महात्मा जोतिराव फुले व *क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तळागळातील व उपेक्षित लोकांना शिक्षणाची दारे खूली करून दिली त्याच मार्गावर महात्मा फुले हायस्कूल या शाळेचे कार्य सुरु आहे.
या यशाबद्दल संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. आण्णासो. विजय महाजन व सर्व संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए.एन.महाजन तसेच वर्ग शिक्षक श्री. एस पी माळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक करून पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here