जळगाव (संपादक सुनिल पाटील) – २८ जुलै रोजी बुधवारी पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉलमध्ये झालेल्या बकरी ईद निमित्त माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील सर्व मशिदीचे इमाम, ट्रस्टी व इदगाह ट्रस्टचे पदाधिकारी यांची सभा बोलावलेली होती या सभेत जिल्हाधिकारी, महापौर, आयुक्त मनपा, तसेच पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त, अप्पर पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस अधीक्षक यासह शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक यांचा समावेश होता
पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांनी प्रास्ताविका द्वारे शासनाचे १७ जुलै २०२० च्या परिपत्रकानुसार मुस्लिम समाजाने ईद साजरी करावी असे आवाहन केले.
त्यानंतर उपस्थितांपैकी ज्या कोणाला काही सूचना अथवा उपाय सुचवायचे असतील त्यांनी हात वर करून उपाय सुचवावे असे सूत्रसंचालकाने घोषित केल्यावर सर्वप्रथम मणीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की शासन परिपत्रक १७ जुलै २०, माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांचे११ जुलै २०चे परिपत्रक महाराष्ट्र प्राणी प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी सर्जनशील कायदा, सुप्रीम कोर्टाचे १५ सप्टेंबर २०१५ चे सायटेशन हे व्यासपीठाच्या समोर ठेवून त्याबाबत मार्गदर्शन मागितले असता फक्त पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त कदम यांनी मार्च २०१५ पासून महाराष्ट्रात गोवंश कायदा लागू करण्यात आलेला आहे एवढेच बोलले त्यावर फारुख शेख यांनी त्यांना कलम २८ बाबत भूमिका व सुप्रीम कोर्टाचा सप्टेंबर २०१५ चा स्टेशन वाचून दाखवला असता त्यांनी उत्तर दिले नाही.
सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की कोर्ट हे कोणत्याही धार्मिक विधीच्या आड येणार नाही व जी परंपरा शतका पासून सुरू आहे त्याला आम्ही थांबू शकत नाही.
तसेच प्रतीकात्मक कुर्बानी ची व्याख्या काय याबद्दल ही प्रशासनाच्या वतीने कोणीही अधिकाऱ्याने काहीएक सांगितलं नाही, शासनाच्या परिपत्रकानुसार ऑनलाइन किंवा दूरध्वनीद्वारे जनावरे खरेदी करू परंतु त्याची वाहतूक टेम्पोने किंवा ट्रकने केल्यास त्यांना वाहतूक करणाऱ्यांना काही गोरक्षक अडवून मारहाण करतात व त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या पारोळ्यात वसंत वाडी येथील झालेली घटना विशद केली त्यावरही प्रशासनाने काहीही उत्तर दिले नाही आणि प्राणी प्रतिबंधक कायदा कलम 28 धार्मिक परंपरेनुसार जनावरांची कत्तल करू शकतात असे असा कायदा असतानासुद्धा कुर्बानी पासून आपण का परावृत्त करीत आहे याबद्दलही प्रशासनातर्फे उत्तर देण्यात आले नाही.
अयाज अली यांनी आपले मुद्दे उपस्थित करताना फक्त कुर्बानी व नमाज मध्ये सवलत देण्यात यावी अशी मागणी केली, तर जमील देशपांडे यांनी वर्तमान पत्र हे बातमी मध्येच कत्तली ला जाणारे वाहने व चालक-वाहकांना वर गुन्हा दाखल अशी बातमी देतात त्यामुळे वातावरण बिघडते अशा बातम्यांवर प्रशासनाने बंदी आणावी अशी मागणी केली तर जळगाव शहर चे मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी विनंती केली जर सर्व बाबतीत अनलॉक होत आहे तर प्रार्थना स्थळे व ईदगाह का बंद तेही शासनाने एक ऑगस्टपासून उघडावेत जेणेकरून जो तो मनुष्य आपल्या ईश्वराकडे प्रार्थना करून कोरोना महामारी पासून आपला बचाव करू शकतो यानंतर सूत्रसंचालकाने उपस्थितांना पुन्हा आवाहन केले की कोणाला बोलायचे आहे का किंवा सूचना द्यायची आहे का त्यावर उपस्थितां कोणीही उभे राहिले नाही म्हणून आयुक्त मनपा सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, यांनी आपले समयोचित भाषण देऊन ईद आनंदात साजरी करण्याचे आव्हान केले
आमदार राजूमामा भोळे यांनी तर सरळ पोलिसांवर आक्षेप घेतला व आपण गुन्हेगारांना सन्मानपूर्वक वागणूक देतात व समाजसेवकांना सन्मान देत नाही, समाज सेवक हे खरे बिन पगारी अधिकारी असतात व समाजात जे लोक त्यांचे ऐकता म्हणून आपण या समाज नेत्यांना सन्मान द्यावा जेणेकरून भविष्यात कोठेही समाजातील तेढ निर्माण होणार नाही झाल्यास हेच समाजसेवक पुढे येऊन ते आपसात बसून त्यावर चर्चा करून प्रकरण सोडविता.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र पोलिसांनी योग्य ती काळजी घेऊन हा सण शांततेत होऊ द्यावा अशी विनंती केली
कार्य क्रमाचे सूत्र संचलन पोलीस नाईक मिलिंद केदार यांनी तर आभार जिल्हा पेठ चे पो नि अकबर पटेल यांनी मानले.
सभेत गफ्फार मलीक,करीम सालार,मुफ्ती हारून,झिया बागवान,नगरसेवक रियाझ बागवान,हनिफ शाह बापू, अझीझ सालार,शाहिद सैयद,मुश्ताक सालार, आदी सुमारे १०० लोकांचा समावेश होता.







