महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे जस्टीस पंत यांची घेतली भेट

नवी दिल्ली – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे व तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टीस पी.सी.पंत यांची भेट घेतली व निवेदन सादर केले तसेच चंदीगढ येथे होणाऱ्या AlCOI च्या संमेलनासाठी निमंत्रण ही दिले.

याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट मा.प्रकाश निधी शर्मा, संस्थेचे दिल्ली सचिव ॲडव्होकेट मा.हरजीत सिंग, ॲडव्होकेट अभय निधी शर्मा व आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात कोणावरही अन्याय झाल्यास खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे या प्रसंगी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here