मुंबई (क्राइम रिपोर्टर राजु जाधव) – आज (दि.२६) धारावी-माटुंगा लेबर कॅम्प ६० फूट रोड येथील अकरा को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी बिल्डिंगच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांना सोबत घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अशोक कदर यांनी शालेय शिक्षण मंत्री हिंगोली जिल्हा पालक मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार वर्षाताई गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटी दरम्यान त्यांनी बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंटच्या कामाबद्दल प्रस्ताव देऊन अकरा को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरींसोबत या विषयी चर्चा केली.






