नागपूर पालिकेचा मास्क न घालणाऱ्या नवरदेवाला दंडाचा आहेर

नागपूर (प्रतिनिधी) – राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यातच आता डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही काही नागरिक सर्रासपणे या नियमांकडे दुर्लक्ष करुन नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका नवरदेवाला नागपूर महानगरपालिकेने दंड ठोठावत कारवाईचा आहेरच दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात लग्न समारंभ पार पडल्यावर एका नवरदेवाची वरात काढण्यात आली होती. नवरदेव घोड्यावर बसलेला होता आणि त्याच्यासोबत वरातीतील काही मंडळी सुद्धा होती. मात्र, कोविडच्या या संकटात चेहऱ्यावर मास्क त्यांनी लावलाच नव्हता. यामुळेच नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी या नवरदेवाला दंड ठोठावला आहे.

केवळ नवरदेवच नाही तर वरातीत सहभागी झालेल्या नातेवाईकांनीही चेहऱ्यावर मास्क परिधान केला नव्हता. त्यामुळे या वरातीत सहभागी झालेल्यांवर दंडात्मक कारवाई करुन दंड वसूल केला आहे. नागपुरातील नेहरूनगर येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here