इटावा (उत्तर प्रदेश) – आपण कायम ऐकतो की लग्न मंडपातून नवरी मुलगी पळून जाते, पण येथे तर चक्क नवरा मुलगा भरमंडपातून पळून गेला आहे. वरात लग्नमंडपात पोहोचली, नवऱ्या मुलाचं थाटात स्वागत झालं, पण त्यानंतर अचानक नवरा मुलगा भरमंडपातून पळून गेला. त्यानंतर लग्नासाठी जमलेले पाहुणे मंडळी देखील पळून गेले. नवरीचे नातेवाईक पूर्णपणे गोंधळून गेले. नवऱ्या मुलाचा शोध घेण्यात आला, पण तो काही हाती लागला नाही. अखेर नवऱ्या मुलाच्या वडीलांना नवरीच्या नातेवाईकांनी नवरा का पळाला? याचं कारण विचारलं.
नवऱ्या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने ज्या मुलीला लग्नासाठी होकार दिला होता, लग्न मंडपात ती मुलगी नसून दुसरीचं मुलगी होती. मंडपात दुसरी मुलगी उभी केल्यामुळे नवऱ्या मुलाने भर मंडपातून पळ काढला. यावर मुलीच्या बाजूचे मंडळींनी सांगितलं की, ज्या मुलीचा फोटो दाखवला तिचं मुलगी लग्न मंडपात होती. एवढंच नाही तुम्ही मुलीला पुन्हा पाहा अंस देखील सांगितलं. काही मंडळींनी नवरीचा चेहरा पाहिला देखील पण त्यांना देखील चूक वाटली. अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनलला पोहोचलं.
वधूच्या बाजूने असा आरोप केला गेला की हुंड्याच्या मागणीसंदर्भात नवऱ्या मुलाच्या बाजून हे सर्व केले गेले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केला तेव्हा मुलीकडून आलेलं सर्व सामान पुन्हा त्यांना परत केलं.






