इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली चाहत्यांना माहिती
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : डेरी मिल्क या चॉकलेटच्या जाहिरातीमुळे खूप चर्चेत आलेली अभिनेत्री अभिनेत्री अंगीरा धर लग्नबंधनात अडकली आहे. दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्यासोबत 30 एप्रिल रोजी लग्न झालं. मात्र दोन महिन्यांनंतर अंगीराने आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,’30 एप्रिल 2021 रोजी आनंद आणि मी कुटुंब आणि अगदी जवळच्या मित्र परिवराच्या उपस्थितीत माझ्या मैत्रीला लग्नामध्ये रुपांतरीत केलंय. आमच्या आजूबाजूची परिस्थिती जशी अनलॉक होतेय तसा आम्ही हा आनंद तुमच्यासोबत शेअर केला आहे.’
मिळालेल्या माहितीनुसार आनंद आणि अंगीरा २ वर्षांपासून डेट करत होते. अंगीराने लव पर स्क्वॉयर फिट या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. लवकरच ती मेडे या चित्रपटात दिसणार आहे.






