मोदी सरकारकडून कोरोना पीडितांना मोठा दिलासा, उपचार खर्चावर कोणताही कर नाही

नवी दिल्ली (प्रतिनिधी चेतन किर्दत) – कोरोना साथीमुळे करदात्यांना दिलासा देण्याची घोषणा मोदी सरकारने शुक्रवारी केली. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मोदी सरकारच्या निर्णयांची माहिती दिली आणि कोरोना उपचारातील खर्चावर कर सूट दिली जाईल असे सांगितले.

ठाकूर म्हणाले की, ज्यांनी कोरोना उपचारांवर १० लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे त्यांना कर सूट उपलब्ध होईल. अनुराग ठाकूर म्हणाले, “जर एखाद्या नियुक्तिकर्त्याने आपल्या कर्मचार्यांचा कोव्हिड ट्रीटमेंटवर खर्च केला, तर त्या कर्मचाऱ्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. एखाद्याच्या मृत्यूनंतर नियुक्ती करणाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्याला एक्सग्रेशिया रक्कम दिली, तर त्या व्यक्तीला कर सवलत मिळेल.

ठाकूर म्हणाले, ”जर बाहेरील व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मदत केली आणि मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मदत केली, तर त्या कुटुंबाला कर भरावा लागणार नाही परंतु तो १० लाख रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here