जांभोरा सरपंचपदी सौ अनिता गुजर

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुक्यातील जांभोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या अनिता गुजर यांची बिनविरोध निवड झाली. जांभोरे सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे जांभोरे येथील निष्ठावंत कार्यकर्ते वसंत गुजर यांच्या धर्मपत्नी सौ अनिता गुजर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्याशी धरणगाव शहर संघटक धीरेंद्र पुरभे यांची या संदर्भात चर्चा होऊन वसंत गुजर यांच्या नावावर एकमत झाले.एका गरीब शेतमजुराला शिवसेनेने न्याय दिल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.

भारतीय जनता पक्षाचे एकमेव निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य सागर गुजर यांनी याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या व सरपंच सौ अनिता गुजर यांचा सत्कार उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विलास महाजन, धीरेंद्र पूरभे, नगरसेवक अजय चव्हाण, राहुल रोकडे व ग्रामस्थ, सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here