शिरपूर (प्रतिनिधी) : धुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे रविवार दि. 27 जुन 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीतही जिल्हाप्रमुख श्री.साळुंके यांनी मायक्रो प्लानिंग करण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला. पक्ष जो उमेदवार उभा करेल त्याला निवडुन आणण्याची जबाबदारी पदाधिकारी म्हणुन पार पाडू असा सुर बैठकीत उमटला.
याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख भरत राजपुत, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, विभाभाई जोगराणा, विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटुसिंग राजपुत, तालुकाप्रमुख दिपक चोरमले, अत्तरसिंग पावरा, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, शहरप्रमुख देवेंद्र पाटील, महिला उपजिल्हा संघटीका विणाताई वैद्य, दिनेश गुरव, मसुद शेख, जितेंद्र राठोड, तुषार महाले, वज्जुभाई, रिहान काझी, दिपक राजपुत, पिंटु शिंदे, जितेंद्र पाटील, स्वीय सहायक रुपेश मराठे आदी उपस्थित होते.






