धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली : हेमंत साळुंके

नरडाणा (प्रतिनिधी) : धुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिंदखेडा तालुका शिवसेनेने कंबर कसली असून मागील निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार सर्वात जास्त मते मिळवून क्र.2 वर होते. मायक्रो प्लानिंग केल्यास या गटात निश्चितच यश मिळेल, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी येथे व्यक्त केला.

धुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साई चॅरिटेबल ट्रस्टचे न्यु इंग्लिश स्कुल येथे दि.27 जुन 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. पक्ष जो उमेदवार उभा करेल त्या उमेदवाराला निवडुण आणण्याची जबाबदारी पदाधिकारी म्हणुन पार पाडू असा सुर बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलतांना श्री.साळुंके म्हणाले की, या गटात सरपंच देखील शिवसेनेचे आहे. अनेक गावांत पक्षाची सत्ता आहे. त्याच्या फायदा पक्षाला निवडणुकीत मिळू शकतो. त्यासाठी आपल्याला आजपासूनच कामाला लागावे लागेल. त्यासाठी सुक्ष्म प्लानिंग करावे लागेल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका लढवल्या जातील. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. एक दिलाने काम केल्यास यश नक्कीच मिळेल, असे श्री.साळुंके यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, दोंडाईचा उपतालुका संघटक शैलेश सोनार, शहर प्रमुख संतोष देसले, शहर संघटक राजेश रुपचंदाणी, महिला उपजिल्हा संघटीका ज्योतीताई सिसोदे, स्थानीय लोकाधिकार समितीचे हिरालाल बोरसे, माजी विधानसभा संघटक साहेबराव (छोटु) पाटील, शेतकरी सेनेचे चंद्रसिंग ठाकूर, दिनेश सिसोदे, संतोष माळी, गोरख माळी, अशोक पाटील, जितेंद्र पाटील, नंदु सोनार, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप पवार, उपतालुकाप्रमुख प्रतिक पाटील, दिपक बोरसे, स्वीय सहायक रुपेश मराठे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here