राही सरनोबतचा ‘सुवर्णवेध’; क्रोएशियात सुरू असलेल्या वर्ल्डकप नेमबाजीत देशाला पहिले सुवर्णपदक

ओस्जेक : आयएसएसएफ शुटिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले. राहीने २५ मीटर पिस्तुलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत राहीने ३९ गुणासह अव्वल स्थान मिळवले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन पदक मिळवली आहेत. भारताने याआधी एक रौप्य आणि कांस्य पदक जिंकले आहे.

सोमवारी झालेल्या स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या प्रकारात फ्रान्सच्या माथिल्डे लामोले हिला रौप्य तर रशियाच्या व्हिन्टालियनाला कांस्य पदक मिळाले. शुटिंग वर्ल्डकपमध्ये राहीने देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. अंतिम फेरीत राहीने ४० पैकी ३९ गुण मिळवले. अंतिम फेरीच्या आधी राहीने एकूण ५९१ गुणांसह दुसरे स्थान मिळवले होते. पण अंतिम फेरीत राहीने इतिहास घडवला. तिने तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सिरीजमध्ये परफेक्ट स्कोअर करून सुवर्ण जिंकले. राहीच्या या यशाबद्दल सोशल मीडियावर तिचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here