महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

कसगी येथे सीमेवर कर्नाटक पोलिसांनी सीमा तपासणी चेक नाका उभारल्याच्या कारणावरून वाद

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कसगी येथे सीमेवर कर्नाटक सीमेवर कसगी हद्दीत कर्नाटक सरकार अतिक्रमण करून पोलीस तपासणी नाके व सीमा तपासणी नाके उभारून महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण करीत असल्याने आज दुपारी येथे तणाव निर्माण होऊन हा वाद इतका चिघळला शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने सामने आले आहेत.

कसगी येथे महाराष्ट्र व कर्नाटक सीमा आहे. ह्या ठिकाणी कर्नाटक पोलीस तपासणी नाक्याच्या नावाखाली अधूनमधून चेकपोस्ट उभारतात . हे चेकपोस्ट महाराष्ट्रातील महसुली हद्दीत असतात . कलबुर्गी जिल्हाधिकारी यांनी नुकतेच ह्या भागात भेट देउन, कर्नाटक सरकारद्वारे ह्या भागात नव्याने कायमस्वरूपी तपासणी नाके उभारले जाणार आहेत अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र हे तपासणी नाके कसगी गावाच्या महसुली क्षेत्रात उभारण्यात येणार असल्याने, एक प्रकारे हे कर्नाटकचे महाराष्ट्र हद्दीत अतिक्रमण असल्याने ह्याला कसगी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ह्यावेळी उमरगा पोलीससुद्धा घटनास्थळी हजर होते

उमरगा मतदार संघाचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निर्देशानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आता सीमा भागात तणावाचं वातावरण तयार झाले आहे. कर्नाटकच्या या अतिक्रमण प्रकरणाने आगामी काळात या भागात वाद पेटणार आहे. सीमेच्या लगत महाराष्ट्र हद्दीत कर्नाटक पोलिसांनी तात्पुरते सीमा तपासणी नाके उभे केले आहेत, अशी लेखी तक्रार शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे.

सीमा नाके हे नेहमी आपआपल्या राज्याच्या महसुली भागात उभारले जातात. मात्र, कर्नाटक शासनाच्या वतीने या भागात नव्याने कायमस्वरूपी सीमा तपासणी नाके उभे करण्यात येणार असल्याची माहिती खासगी भागात पाहणी करताना गुलबर्गा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी- कानडी वाद सुरू आहे. शिवसेनेने नेहमी मराठीचा मुद्दा लावून धरत कर्नाटकला विरोध केला. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा वादंग पेटले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here