नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे व त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कौपरखैरणेमधील भाजप नगरसेविका व तिचा पती यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन अज्ञातांनी रि्व्हॉल्वर व कोयत्याच्या सहाय्याने हा हल्ला केला आहे. यामध्ये नगरसेविका व तिचा पती दोघेही जखमी झाले आहेत.

संगिता म्हात्रे असे हल्ला झालेल्या भाजप नगरसेविकेचे नाव आहे. तर, संदीप म्हात्रे असे तिच्या पतीचे नाव आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ मधील कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

हल्ल्यात संदीप म्हात्रे यांच्या खांद्यावर कोयत्याचे वार करण्यात आले. आरोपींकडून हल्ला होताच दोघांनीही आरडाओरड केली. तेव्हा आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांना एका आरोपीला पकडण्यात यश आले आहे. तर दुसरा आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हल्ल्यात जखमी झालेले संदीप म्हात्रे यांच्यावर नवी मुंबई पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी कौपरखैरणे पोलीसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here