पुलवामामध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबावर घरात घुसून गोळ्यांचा वर्षाव

माजी विशेष पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू; मुलगी गंभीर जखमी

जम्मू (ऑल इंडिया सहसंपादक राजन चौधरी) – पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी विशेष पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची हत्या केलीय तर या जोडप्याची अल्पवयीन मुलगी या गोळीबारात गंभीर जखमी झालीय. रविवारी रात्री ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी विशेष पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांच्या घरावर दहशतवाद्यांनी रात्रीच्या अंधारात हल्ला केला. दहशतवाद्यांनी थेट घरात शिरून पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नी राजा बेगम यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. रात्री ११.०० वाजल्याच्या सुमारास पुलवामाच्या अवंतीपोरा भागातील इरिपरिगाम भागात ही घटना घडली.

या घटनेत फय्याज अहमद यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर झालेल्या त्यांच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचार सुरू असताना राजा बेगम यांचा मृत्यू झाला. तर मुलगी राफिया गंभीर स्वरुपात जखमी आहे.या घटनेनंतर सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. तसंच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here