अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

दोन हजार किलोमीटरपर्यंत करु शकते मारा

नवी दिल्ली : डीआरडीओने सोमवारी आणखी एका अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता शत्रुला चांगलीच धडकी भरणार आहे. अग्नी प्राईम हे क्षेपणास्त्र अग्नी याच जातीतील अग्नी क्षेपणास्त्रांमधील वेगवान आणि २००० किलोमीटरपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अग्नी प्राईम क्षेपणास्त्र हलक्या वजनाचं असून आकारानेही छोटे आहे. परंतु हे वेगवान आणि घातक आहे. याच्या बनावटीमध्ये नव्या तांत्रिक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. मागील आठवड्यात डीआरडीओने निर्भय मिसाईलची यशस्वी चाचणी केली असून निर्भयची मारक क्षमता ही १ हजार किलोमीटरपर्यंत आहे.

अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशातील बालासोर येथे करण्यात आली आहे. अग्नी क्षेपणास्त्र घातक अण्वस्त्र वाहूनही नेऊ शकते. या क्षेपणास्त्राची चाचणी सोमवारी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी करण्यात आली आहे. क्षेपणास्त्राच्या चाचणीवेळी काही रडार स्टेशन बसविण्यात आली होती. या रडार स्टेशनच्या माहितीनुसार अग्नी क्षेपणास्त्राने यशस्वीपणे सर्व प्रक्रिया पुर्ण करुन उद्देशापर्यंत वाटचाल केली आहे.

अग्नी प्राईम क्षेपणास्त्र हे आधीच्या अग्नी क्षेपणास्त्रांचाच भाग आहे. अग्नी प्राईमच पहिल्या मिसाईलपेक्षा हलक्या वजनाचे आहे. अग्नी १ ची चाचणी १९८९ मध्ये करण्यात आले होते. यानंतर २००४पासून सेनेत सहभागी करण्यात आले आहे. त्याची मारक क्षमता ही ७०० ते ८०० किलोमीटर आहे.

दरम्यान, आयटीआरवर निर्भय मिसाईचीही यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. यामुळे आता भारताच्या ताफ्यात मिसाईलची भरती झाली असून भारत शक्तीशाली बनत चालला आहे. निर्भय मिसाईल हे आण्विक हत्यार यशस्वीपणे वाहून नेणारं क्रुज मिसाईल आहे. याची लांबी ६ मीटर असून १५०० किलो वजनाचे आहे. परंतु याची मारक क्षमता ही अग्नी क्षेपणास्त्रापेक्षा कमी आहे. १ हजार किलोमीटरपर्यंत याची मारक क्षमता आहे. निर्भय मिसाईलची चाचणीही १० वाजून ४५ मिनिटांनी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here