माध्यमिक विद्यालय शिरसाड-साकळी येथे जि.प.शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

यावल (सुरेश पाटील) – तालुक्यातील साकळी येथील माध्यमिक विद्यालय शिरसाड-साकळी या शाळेत संस्थेचे अध्यक्ष व जळगाव जि.प.चे शिक्षण,आरोग्य व क्रिडा सभापती रविद्र सुर्यभान पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक के.एल. बडगुजर यांनी त्यांचा सत्कार केला . तसेच सत्कारार्थी रविंद्र पाटील यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.संध्या शिंदे, ग्रा.पं. सदस्य साहेबराव बडगुजर, माजी ग्रा.प.सदस्य दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन फन्नाटे, मिलिंद जंजाळे, उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here