मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदुर्णी शिवसेना शाखेतर्फे विविध उपक्रम

जामनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त बुधवारी शेंदूर्णी शहर शिवसेना शाखेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत गरजू लोकांना मास्क वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात निःस्वार्थ व प्रामाणिक सेवा करणाऱ्या कोरोना योध्द्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. या सर्व उपक्रमांदरम्यान कार्यक्रमासाठी शिवसेना शेंदुर्णी शहर प्रमुख भैया भाऊ गुजर ज्येष्ठ शिवसैनिक अशोक भाऊ बारी विलास भाऊ भारी माजी युवा सेना तालुका प्रमुख विनोद भाऊ नाईक सुनील भाऊ गुजर सिद्धेश्वर भाऊ पाटील भरत भाऊ पाटील भूषण बडगुजर युवा सेनेचे सोनू भाऊ पगारे राहुल कुमावत लखन कुमावत भैया भैया भाऊ भारी प्रवीण चौधरी विलास भाऊ पाटील तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here