भुसावळ (गिरीश पवार) – ग्रामपंचायत मंगल कार्यालयाचे कार्य पूर्णत्वाकडे असून आज दिनांक 29 रोजी भुसावळ तालुक्याचे कर्तबगार
कर्तव्यदक्ष लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या उपस्थित मंगल कार्यालयाच्या स्लॅब भरणा शेवटच्या टप्प्याचे नारळ फोडून सुरुवात करण्यात आली तसेच मंगल कार्यालय ऑगस्ट 2020 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करून लोकार्पण करावे अशा सूचना श्री सावकारे साहेब यांनी उपस्थित बांधकाम विभाग इंजिनीयर कुरेशी रावसाहेब व ठेकेदार राजकरण चौधरी यांना दिल्या
प्रसंगी सरपंच अनिल पाटील संजय पाटील माजी सरपंच आनंद ठाकरे सुभाष कोळी ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील सुरेश पाटील दिगंबर पाटील गजानन कोळी अनिल सोनवाल बळीराम सोनवणे ग्राम विकास अधिकारी गौतम वाडे आदींची उपस्थिती होती
साकेगाव ग्रामपंचायत मंगल कार्यालय चूडामण नगरातील पाण्याच्या टाकी शेजारील 28 हजार स्क्वेअर फिट ओपन स्पेस जागेत बांधकाम पूर्णत्वास आले असून गावातील नागरिकांना सांस्कृतिक तसेच पारिवारिक लग्न समारंभ तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी उत्कृष्ट सुविधा आमदार संजय भाऊ सावकारे व खासदार रक्षाताई खडसे यांच्या 40 लक्ष रुपयांच्या विशेष फंडातून निर्माण झालेली आहे समस्त ग्रामस्थांना आनंद झालेला असून आमदार संजय भाऊ सावकारे व खासदार रक्षाताई खडसे यांचे सर्व ग्रामस्थ आभार व्यक्त करत आहे.
Home Uncategorized साकेगाव ग्रामपंचायत मंगल कार्यालय लोकार्पणसाठी सज्ज करावे – आमदार संजय भाऊ सावकारे







