शहादा (विजय पाटील) – काल नाशिक विभागीय मंडळाचा इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला यात शेठ व्ही के शाह विद्या मंदिराच्या निकाल 96.51% लागला यात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने देसले विवेक पंकज हा उत्तीर्ण झाला त्याला शेकडा 97.40 गुण प्राप्त झाले ( 500 पैकी 482 मार्क मिळाले ) तो शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तसेच शाळेतील द्वितीय क्रमांकाने पाटील मेहुल मनोज विद्यार्थी उत्तीर्ण झाला त्याला 96.80% गुण मिळाले व तृतीय क्रमांकाने 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाटील भूषण टीलाभाई व सोनवणे चेतना प्रवीण दोघांना 96.60 % गन मिळाले तसेच या परीक्षेत शाळेतील बेंद्रे आनंद संजय या विद्यार्थ्यास गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले व आगळे राजरत्न गौतम या विद्यार्थ्यास विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले शाळेतील एकूण 545 पैकी 526 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात 317 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले तसेच 148 विद्यार्थी प्रथम श्रेणी 50 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन व नगराध्यक्ष तात्यासाहेब श्री मोतीलाल फकीरा पाटील ,व्हा चेअरमन श्री हिरालाल नगीन पटेल ,संचालक व नंदुरबार जि प बांधकाम सभापती दादासो श्री अभिजित पाटील ,सर्व संचालक मंडळ ,शाळेचे मुख्याध्यापक श्री आय डी पटेल, उपमुख्याध्यापक श्री एस डी भोई , पर्यवेक्षक श्री ए एन पाटील ,पर्यवेक्षिका श्रीमती उषा खैरनार ,पर्यवेक्षक श्री आय एन चौधरी , कार्यालय प्रमुख श्री एम के पाटील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.







