मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या पथकावर हल्ला, ३ जवान शहीद

इम्फाळ – मणिपूरमधील दक्षिण भागात ४ आसाम रायफल्सच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले असून ४ जवान गंभीर जखमी झाले आहेत.
पीपल्स लिबरेशन आर्मी या स्थानिक बंडखोर गटातील दहशतवाद्यांनी मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या भागात आसाम रायफल्सच्या पथकावर हल्ला केला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी पहिल्यांदा आयईडीचा स्फोट केला आणि त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले असून, ४ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here