उंदीर मातेची पिल्लांसाठी निसर्गाशी लढत

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कवयित्री बहिणाबाईंचे सुंदर काव्यामधील प्रसिध्द काव्यपंक्ती अरे खोप्यामदी खोपा, देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला ! पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला ! मधील ओळी सार्थ करणारी घटना सध्या सोशल मिडीयावर एका व्हिडीओच्या रुपाने व्हायरल होत आहे.
आई आपल्या बाळांसाठी काय करू शकते याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. आपण तत्सम प्राणी म्हणून उंदराकडे पाहतो. मात्र मातृत्व हे देवाहूनही किती श्रेष्ठ आहे याचा हा ताजा नमुना असलेला उंदीर मातेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. पाऊस सुरु झाल्यावर बिळात पाणी जात असताना उंदीर आई आपल्या लेकरांसाठी प्रकृतीशी लढताना या व्हिडीओत दिसते. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ फिरत असून, त्याला भरपूर लाईक्सदेखील मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here