मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – जॉय या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२० रोजी श्री. समर्थ विद्यालय,
बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व येथे आरे आदिवासी पाड्यातुन शिक्षणासाठी येणाऱ्या जवळजवळ १३० विद्यार्थ्यांच्या पालकांना जीवनावश्यक अन्नधान्य किट म्हणजेच तांदूळ, डाळ, साखर, पोहे, लापशी, साबण आणि मास्क वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपलं महानगर या लोकप्रिय दैनिकाचे संपादक संजय सावंत उपस्थित होते. गेल्या पाच वर्षपासून या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी, गोर गरीब व वंचित विद्यार्थ्यांना जॉय संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापिका निंबाळकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी व सहकार्य करण्यासाठी शिवसेना उपविभाग प्रमुख जयवंत लाड, सालम जीमचे संस्थापक सूर्यकांत सालम, पश्चिम रेल्वेचे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त मोटरमन चंद्रशेखर सावंत, श्रीकांत रेडकर, फिलिप रॉड्रिक्स, अजित वैद्य, प्रमोद निकते, धनंजय कोरगावकर, अक्षय कदम, दीपक पाटील, प्रियांस हिरवे या सर्वांनी पुढाकार घेतल्याचे जॉय ऑफ गिविंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी देखील जॉयच्या माध्यमातून लॉकडाउन काळात असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून पुढेही वर्षभर हे सर्व काम सुरूच राहणार असल्याचे वक्तव्य हिरवे यांनी सांगितले. संस्थेने राबललेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पालक वर्गाने संस्थेचे यावेळी आभार ही मानले.







