मुबंई (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागांतर्गत पात्र झोपडी धारकांचे पूनर्वालोकन (फेरतपासणी) थांबवण्यात यावी व हब टाऊन विकासक व (पूर्वीचे मे.आकृती प्रा.लिमीटेड)या संबधीत विकासकाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व महामंडळाकडून परीषीष्ट-२ मद्धे पात्र झालेल्या व गेल्या अनेक वर्षापासून पात्र रहिवासी यांची या पूर्वी रद्द केलेली व विकासकाच्या मागणी वरून पूनर्वालोकन (फेरतपासणी) करण्यासाठीची सूचना पत्रक काढल्याने व सदर, सुनावणीस हजर न राहील्यास अपात्र करण्याची सूचना जाहीर केल्याने रहिवासी हवालदिल झाले असून ही प्रक्रीया अन्यायकारक असून नागरीकाना वेठीस धरणारी आहे.
एकीकडे या महामंडळाकडून अनेक पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन व भाडे थकीत असताना विकासकाचे कोणतेही कार्यालय विभागात उपलब्ध नसताना अनेक नागरिक रहिवासी देशोधडीला चकरा मारून लागले असताना विकासक वरती कारवाई करण्या ऐवजी हे कार्यालय विकासकाच्या विनंती वरून पात्र रहिवासी यांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याने व ते तत्काळ थाबवावेत व पूनर्वालोकन करण्याची काढलेली नोटीस त्वरीत, मागे घेण्यात यावी व रखडलेले पुनर्वसन व पात्र रहिवासीयांचे भाडे तत्काळ विकासकाने देण्यात यावे या साठी कार्यालयाने प्रयत्न करावेत व रहिवासी यांना न्याय मिळवून द्यावा या मागणी करीता उ.प.मुंबई जिल्हा यूवती आघाडीच्या वतीने दिनांक २८ जून सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) कार्यालय उद्योग सारथी मरोळ विभाग अंधेरी पूर्व येथे उग्र निदर्शने आंदोलन आयोजीत करण्यात आली होती आंदोलनाचे आयोजन उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष यूवती आघाडी रेश्मा खान यांनी केले होते
या आंदोलनात मार्गदर्शक प्रमूख उपस्थिती मूंबई प्रदेश उपाध्यक्ष रमेश जोगदंड, सलमान खान, उ.प.मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आनंद थोरात, रमेश ए.पाळंदे, मूंबई प्रदेश उपाध्यक्ष महीला आघाडी नितूताई मोरे, यूवती आघाडी उ.प.मुंबई जिल्हा सरचिटणीस श्रीदेवी राठोड, उ.प.मुंबई जिल्हाप्रमुख सोशल मिडीया, आय.टि.सेल व गोरेगाव तालूका अध्यक्ष रमेश वि.पाईकराव, मूंबई प्रदेश उपाध्यक्ष अमोल पवार, उ.प.मुंबई जिल्हा उपाध्यक्ष किरण पवार, गोरेगाव तालूका सरचिटणीस गूरूनाथ गायकवाड, उ.प.मुंबई जिल्हा महीला आघाडी प्रमूख संघटक शोभाताई धबाले, गोरेगाव तालूका उपाध्यक्ष मिलींद अंभोरे, यूवा उपाध्यक्ष बबलू ढवारे, जोगेश्वरी तालूका उपाध्यक्ष महीला आघाडी ज्योतीताई जोगदंड, वार्ड क्र.५३ महीला वार्ड अध्यक्षा गवळणताई जाधव वार्ड क्र.७४ अध्यक्ष सय्यद अकबर, सचिव अजहर रिजवी,वार्ड क्र.५३ अध्यक्ष अजमेर शेख, शाखाध्यक्ष विशाल पाईकराव, वार्ड क्र.५८ अध्यक्ष विजय सागरे, सचिव राजेश मूदलीयार, वार्ड क्र.५४ अध्यक्ष लखन प्र.पाईकराव, उपाध्यक्ष विजय धबाले, वार्ड क्र.५४ महीला वार्डअध्यक्ष कीशाताई सौदरमल, गोरेगाव तालूका सहसचिव रवी सहेजराव, दिंडोशी विभागातून महीला यूवती आघाडीच्या मालाताई जयसवार, फातिमा खान, इमरान अहमद, मणीश जैसवार, सरोज दिक्षित, निशा शर्मा, राघवेंद्र शर्मा, मिना शर्मा, व इतर मान्यवर रिपब्लिकन पक्षाचे फोटोग्राफर व मित्र देवेंद्र रणपिसे, व मित्र जयवंत बनसोडे, यांच्या उपस्थितीत निदर्शने आंदोलन संपन्न झाले आंदोलनाचे समापन करताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपायूक्त मा.अंभोरे साहेब यांना निवेदन देवून येत्या पंधरा दिवसात मागण्याची पूर्तता न झाल्यास कार्यालया समोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्याचा लेखी निवेदना द्वारे इशारा देवून आंदोलन व निदर्शने संपन्न करण्यात आली.






