अभिनेत्री फ्रिडा पिंटोकडे गोड बातमी

सोशल मीडियावर बेबी बंप दाखवत शेअर केला आनंद

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो हिने चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. लवकरच ती आई बनणार आहे. अभिनेत्री फ्रिडा पिंटोने मंगळवारी जोडीदार कॉरी ट्रॅन याच्यासह एक फोटो शेअर करुन तिच्या गरोदरपणाची बातमी दिली आहे.

या फोटोमध्ये फ्रिडाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. काळ्या फुलांच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना फ्रिडाने लिहिले, ‘बेबी ट्रॉन येत आहे’. पहिल्या फोटोमध्ये जिथे हे दोघेही कॅमेराकडे पहात आहेत आणि पोझ देत आहेत, दुसऱ्या फोटोमध्ये कॉरी आणि फ्रिडा एकमेकांच्या नजरेत हरवले आहेत

२००८ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या ब्रिटिश ड्रामा फिल्ममधून सर्वांचे मन जिंकणाऱ्या फ्रिडाने २०१९ मध्ये कॉरीशी साखरपुडा केला होता. एंगेजमेंटची बातमी सांगताना फ्रिडाने लिहिले होते की, ‘आयुष्य आता समजले आहे, जग आता समजत आहे, जुन्या प्रेमी प्रेमाबद्दल जे काही म्हणायचे ते जाणवत आहेत. तू माझं प्रेम आहेस जो माझ्या आयुष्यात आला आहेस आणि तू आता इथेच राहशील, कारण मी तुला थांबवून ठेवेन…’ फ्रिडाचा जोडीदार, कॉरी ट्रॅन हा एक छायाचित्रकार आहे. ती अनेकदा कॉरीसह आपले फोटो शेअर करत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here