ईगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण; बंगला मालकही पोलिसांच्या ताब्यात
नाशिक (विशेष प्रतिनिधी) : बिग बॉसमधील सहभागी बॉलिवूड अभिनेत्री हीना पांचाळसह रेव्ह पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या एकूण २४ संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी एकूण २९ जणांना अटक केली असून बंगला मालकालाही मुंबईतून ताब्यात घेतले आहे.
एक दिवसाची न्यायलीयन कोठडी हीनासह अन्य संशयितांना सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपली असता पोलिसांनी पुन्हा त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.






